Ad will apear here
Next
मी ‘पुलं’चा एकलव्य : अशोक सराफ


पुणे :
 ‘‘पुलं’चा प्रत्यक्ष सहवास मला लाभला नसला, तरी त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून मी कायमच त्यांच्या सहवासात असतो. साहित्यातून पात्र उभे करण्याची ‘पुलं’ची शैली अवगत करून मी ती माझ्या अभिनयाद्वारे चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी यशस्वी ठरलो आहे. मी ‘पुलं’चा एकलव्य आहे. माझ्या आजपर्यंतच्या वाटचालीत ‘पुलं’च्या साहित्याचा सिंहाचा वाटा असून, ते माझ्यासाठी दैवत आहेत,’ अशा भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या.

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुलं परिवाराच्या सहयोगाने, आशय सांस्कृतिक व स्क्वेअर वनने वर्षभर आयोजित केलेल्या ‘ग्लोबल पुलोत्सवा’चा समारोप सोहळा नुकताच झाला. त्या वेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पुलोत्सव जीवनगौरव आणि ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. त्या वेळी अशोक सराफ बोलत होते. पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र,  सन्मानचिन्ह आणि २५ हजार रुपये असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.

या वेळी व्यासपीठावर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे क्षेत्रीय प्रबंधक सुशील जाधव, व्ही. शांताराम फाउंडेशनचे प्रमुख किरण व्ही. शांताराम, ‘आशय सांस्कृतिक’चे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, स्क्वेअर वनचे नयनीश देशपांडे आणि मयूर वैद्य, दी कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे संचालक  आणि  कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.

पोंक्षे म्हणाले, ‘या पुरस्काराने माझी जगण्याची उमेद वाढवली. आजाराला हसत हसत सामोरा गेल्यामुळेच आज तुमच्यासमोर उभा आहे.’

‘दलित साहित्याविषयी ‘पुलं’ना प्रचंड आस्था होती. ज्या ज्या दलित साहित्याला ‘पुलं’चा परीसस्पर्श झाला, ते साहित्य प्रचंड गाजले,’ असे प्रतिपादन डॉ. जाधव यांनी केले. 

(अशोक सराफ यांचा मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZXECG
Similar Posts
‘पुलं’च्या जिभेवर सरस्वतीचे वास्तव्य : पं. हरिप्रसाद चौरसिया पुणे : ‘‘पुलं’ची आणि माझी केवळ दोन-तीन वेळाच भेट झाली; पण त्यांची प्रत्येक भेट त्यांच्यातील गुणांचे दर्शन देणारी होती. त्यांची भाषा आणि बोलणे हे दोन्ही मी अनुभवले आणि मी थक्क झालो. कारण त्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वतीचे वास्तव्य होते,’ असे मत ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी व्यक्त केले
संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी पाठपुरावा करणार पुणे : ख्यातनाम नाटककार, लेखक आणि शब्दप्रभू कवी राम गणेश गडकरी यांच्या १०१व्या स्मृतिदिनानिमित्त २३ जानेवारी २०२० रोजी पुण्यातील संभाजी उद्यानातील मुख्य दरवाज्याजवळ त्यांच्या प्रतिमेची व साहित्याची पूजा करण्यात आली. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गडकरींचा पुतळा संभाजी उद्यानात पुन्हा बसवण्यात यावा, अशी
पं. हरिप्रसाद चौरसिया यांना पुलं स्मृती सन्मान; अशोक सराफ, रेणू दांडेकर, शरद पोंक्षे, चिन्मय मांडलेकर यांचाही गौरव पुणे : साहित्य, नाट्य, सिनेमा, संगीत, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत उत्तुंग कर्तृत्व गाजवलेले महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘आशय सांस्कृतिक’ आणि ‘स्क्वेअर वन’ने ‘पुलं’च्या परिवाराच्या सहयोगाने ‘ग्लोबल पुलोत्सवां’तर्गत वर्षभर जगभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते
कलाकार घडण्यासाठी हवा प्रत्यक्ष अनुभवच; तंत्रज्ञानाचा वापर कलात्मकता मारण्यासाठी नको पुणे : ‘हल्ली इंटरनेटवर कोणता विषय मिळत नाही असे नाही. त्यामुळे मुलांना एखादा विषय सांगितला की पालक लगेच मोबाइल, इंटरनेट वापरतात; मात्र कोणताही कलाकार घडायचा, घडवायचा असेल, तर मुलांना प्रत्यक्ष अनुभवच देणे आवश्यक असते. स्वतःच्या कल्पकतेने, सर्जनशीलतेतून आणि निरागसतेतून साकारलेली कलाच दीर्घ काळ टिकाव धरू शकते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language